esakal | अंदमान निकोबारला नेतो सांगून 24 जणांची फसवणूक 
sakal

बोलून बातमी शोधा

Twenty-four cheated by claiming to take a trip to Andaman and Nicobar

औंध येथील 70 वर्षीय नागरिकाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शिरीष खेडेकर (रा. रानडेवाडा, सदाशिव पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा प्रकार ऑगस्ट 2018 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये घडला. फिर्यादीला सहलीसाठी जायचे होते. त्या वेळी खेडेकर हा त्यांच्या संपर्कात आला. त्याने फिर्यादीला 32 हजार रुपयांमध्ये अंदमान व निकोबार येथे सहलीला नेण्याचे आमिष दाखविले.

अंदमान निकोबारला नेतो सांगून 24 जणांची फसवणूक 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : सहलीच्या नावाखाली 24 नागरिकांकडून सव्वापाच लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

चिकन बिनधास्त खा, कोरोनाशी संबंध नाही!

औंध येथील 70 वर्षीय नागरिकाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शिरीष खेडेकर (रा. रानडेवाडा, सदाशिव पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा प्रकार ऑगस्ट 2018 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये घडला. फिर्यादीला सहलीसाठी जायचे होते. त्या वेळी खेडेकर हा त्यांच्या संपर्कात आला. त्याने फिर्यादीला 32 हजार रुपयांमध्ये अंदमान व निकोबार येथे सहलीला नेण्याचे आमिष दाखविले.

Video : पुणे : इंजिनिअरिंगची पुस्तके मिळणार आता भाड्याने

फिर्यादीसह त्याने आणखी 23 जणांकडून प्रत्येकी 32 हजार असे एकूण पाच लाख 28 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याने ऐनवेळी विमानाची तिकिटे मिळाली नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने संबंधितांना पैसे परत करण्याचे आश्‍वासन दिले. फिर्यादीने सतत पाठपुरावा केल्यानंतर त्याने त्यांना आठ हजार रुपये दिले. उर्वरित 24 हजार रुपये दिले नाहीत. फिर्यादी व इतरांची एकूण पाच लाख 28 हजार रुपयांची फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक सी. एम. सूर्यवंशी तपास करीत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image