झेडपीत चोवीस तास वैद्यकीय सहायता कक्ष 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

जिल्हा परिषदेच्या ६१५ आरोग्य उपकेंद्रांपैकी ५८५ ठिकाणी पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी देणार आहे. तसेच जिल्हा परिषदेत चोवीस तास चालणारा वैद्यकीय सहायता कक्ष सुरू केला आहे.

पुणे - ‘‘जिल्हा परिषदेच्या ६१५ आरोग्य उपकेंद्रांपैकी ५८५ ठिकाणी पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी देणार आहे. तसेच जिल्हा परिषदेत चोवीस तास चालणारा वैद्यकीय सहायता कक्ष सुरू केला आहे,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी दिली. तसेच परिसरात दोन वर्षात स्वतंत्र आरोग्य केंद्र उभारणी पूर्ण करू, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाघळवाडी (ता. बारामती) येथे काकडे यांचा आरोग्य व बांधकाम सभापतिपदी निवड झाल्याबद्दल तर बापू धापटे यांचा बारामती पंचायत समितीच्या उपसभापतिपदी निवड झाल्याबद्दल चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सोमेश्वरचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे होते. याप्रसंगी सरपंच नंदा सकुंडे, अंकुश सावंत, रमाकांत गायकवाड, लक्ष्मण गोफणे, सिद्धार्थ गीते, गौतम काकडे, महादेव सावंत, विकास जाधव, दिग्विजय जगताप, धनंजय गडदरे आदी उपस्थित होते.

माझी यापूर्वी सभापतिपदाची संधी हुकली आणि नेमकी आता मिळाली हे बरे झाले. कारण आता राज्यात सत्ता असून, अजित पवार अर्थमंत्री आहेत आणि मी बांधकाम सभापती. आता फक्त चोख प्रस्ताव द्या आणि योजना घ्या, असे आवाहन प्रमोद काकडे यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty-four hours in the medical aid room

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: