मेदनकरवाडी येथे दांपत्याने घातला वीस लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

चाकण - मेदनकरवाडी (ता. खेड) येथील चारशे महिलांना पाच हजार रुपये दिल्यानंतर रोज तीनशे रुपये घरबसल्या मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे वीस लाखांचा गंडा घालून दांपत्य फरारी झाले. फसवणूक झालेल्या महिलांनी ही माहिती माजी सरपंच रामदास मेदनकर व ग्रामपंचायत सदस्यांना सांगितली. पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठीही या महिला गेल्या होत्या.

मेदनकरवाडीत भाड्याने फ्लॅट घेऊन तसेच कंपनीसाठी भाड्याने जागा घेऊन शहा एंटरप्रायझेस नावाने घरगुती वापराच्या खाद्यपदार्थाच्या व इतर उपयोगाच्या वस्तूंच्या छोट्या प्लॅस्टिकच्या पिशव्या भरण्याचे काम देण्याचे आमिष महिलांना दाखविण्यात आले होते. त्यासाठी प्रत्येक महिलेकडून पाच हजार रुपये अनामत घेण्यात आली. महिलांना त्याबदल्यात वजन काटा, लॅमिनेशन मशिन, स्टेपलर, कॅरिबॅग आदी साहित्य तसेच पिशव्यात भरण्यासाठी पंधरा दिवसांचा माल दिला. याबदल्यात काही महिलांना आठवडाभर तीनशे रुपये दिले. त्यानंतर सदर दांपत्य फ्लॅट सोडून निघून गेले. 

पंधरा दिवस दुकान चालविल्यानंतर ते बंद करून सदर दांपत्य फरारी झाल्याचे कांचन निंबाळकर, भाग्यश्री वाघमारे, ज्योती परांजपे, रूपाली बोरले, रूपाली सोनवणे, रंजना गोसावी, सुषमा निंबाळकर, शीतल येडगे, ज्योत्स्ना भवारगुरू, सुनीता मोरे, सिंधूबाई पानसरे, स्मिता वऱ्हाडे आदींनी सांगितले. या वेळी माजी सरपंच रामदास मेदनकर, माजी उपसरपंच नंदाराम भुजबळ, महेंद्र मेदनकर, अमित मेदनकर, बलराम मेदनकर यांनी संबंधित दांपत्याचा शोध घेऊन महिलांना न्याय देण्याचे आश्‍वासन दिले.

Web Title: twenty lac loot in medankarwadi