भुतांची भिती दाखवली अन् लुटले 21 लाख!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

पुणे - एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेशी ओळख वाढवून तिला भुतांची भिती दाखवून 21 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तरुणीचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वेदिका नीलेश कामत ऊर्फ नेहा निलेश पै असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात वृद्ध महिलेच्या मुलाने फिर्याद दिली होती. फिर्यादी नोकरनिमित्त परदेशी असतात. तर त्यांची आई एकटीच कर्वेनगर येथे राहते.

पुण्यात सायबर विभागातील पोलिसालाच बनावट कॉल

दरम्यान तरुणीने वृद्ध महिलेशी ओळख वाढवून तिला बॅंकेत नेले. त्यानंतर महिलेच्या नावावरील कायमस्वरुपी ठेवीच्या पावत्या गहाण ठेवून 18 लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर तरुणी व तिच्या मित्राने दुरुस्तीच्या नावाखाली महिलेचे घरही बळकावण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने महिलेची तब्बल 21 लाख रुपयांची फसवणूक केली होती. हा प्रकार समजल्यानंतर फिर्यादी यांनी पुण्यात येऊन तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, या प्रकरणामध्ये तरुणीने न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. त्यास अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी विरोध केला. त्यानंतर सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. 

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी दिली 'ही' महत्त्वाची माहिती

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twenty one lakhs fraud by displaying ghostly fear

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: