जुन्नरला विज्ञान मेळाव्यात वीस शाळांचा सहभाग

दत्ता म्हसकर
सोमवार, 23 जुलै 2018

निवृत्तीनगर (धालेवाडी) - ता.जुन्नर येथे जुन्नर तालुका पंचायत समिती व विज्ञान अध्यापक संघाचे वतीने आयोजित तालुका पातळीवरील विज्ञान मेळाव्यात वीस शाळांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत कै. प्रा. रामकृष्ण मोरे इंग्लिश मेडियम स्कूल निवृत्तीनगर येथील गायत्री कवडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. नारायणगावच्या अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मेडियम स्कूलमधील श्रेया सोमवंशी हिचा द्वितीय, तर राजुरीच्या विद्या विकास मंदिरातील साक्षी कणसे हीचा तृतीय क्रमांक आला.

निवृत्तीनगर (धालेवाडी) - ता.जुन्नर येथे जुन्नर तालुका पंचायत समिती व विज्ञान अध्यापक संघाचे वतीने आयोजित तालुका पातळीवरील विज्ञान मेळाव्यात वीस शाळांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत कै. प्रा. रामकृष्ण मोरे इंग्लिश मेडियम स्कूल निवृत्तीनगर येथील गायत्री कवडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. नारायणगावच्या अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मेडियम स्कूलमधील श्रेया सोमवंशी हिचा द्वितीय, तर राजुरीच्या विद्या विकास मंदिरातील साक्षी कणसे हीचा तृतीय क्रमांक आला. तसेच रेणुका निमसे-सबनीस विद्यामंदिर, नारायणगाव, सेजल पटाडे-संभाजी विद्यालय, बोरी बुद्रुक, वेदांत गाडेकर-चैतन्य विद्यालय, ओतूर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

अखिल भारतीय विज्ञान मेळाव्याच्या अनुषंगाने तालुका पातळीवरील विज्ञान मेळावा व बक्षीस वितरण समारंभ रामकृष्ण मोरे इंग्लिश मेडियम स्कूल येथे संपन्न झाला.
यावेळी विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, विस्तार अधिकारी पी. एस. मेमाणे, विज्ञान संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल, उपाध्यक्ष वाय.बी. दाते, सचिव टी. आर. वामन, सदस्य दिलीप लोंढे, बी के नलावडे, संजय कुटे, प्रवीण ताजणे, प्रमोद जाधव, प्रकाश जोंधळे आदी उपस्थित होते.  

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारांची जागृती करणे, बाल वैज्ञानिकांना विचारांचे आदान प्रदानाची संधी देणे, स्पर्धात्मक वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविणे यासाठी या स्पर्धांचे आयोजन केले जाते. पी. एस. मेमाणे यांनी विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन केले स्पर्धांचे बक्षीस वितरण प्राचार्य एस डी मातेले यांचे हस्ते झाले. स्पर्धेतील तालुका पातळीवरील प्रथम दोन क्रमांकाची निवड जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी झाली आहे.

Web Title: Twenty-school participation in Junnar Science Conference