esakal | सासवडच्या शासकीय यंत्रणांना हाताशी धरुन एका जमिनीचा दोनदा विक्री व्यवहार | Cheating
sakal

बोलून बातमी शोधा

crime

सासवडच्या शासकीय यंत्रणांना हाताशी धरुन एका जमिनीचा दोनदा विक्री व्यवहार

sakal_logo
By
श्रीकृष्ण नेवसे

सासवड - चौधरवाडी (ता. बारामती) येथील एका शेती व मेंढपाळीचा व्यवसाय करणाऱ्याची शेतजमिन दोनदा विकण्याचा प्रकार शासकीय यंत्रणेमुळे घडल्याचे प्रकरण पुढे आले आहे. मौजे कर्नलवाडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील गट क्रमांक 46 मधील एकुण 19 एकर 20 गुंठे एवढे क्षेत्र या प्रकरणातील फिर्यादी कामाजी सिध्दु हाके यांनी करंजे (ता. बारामती) येथील काही महिलांना विकले होते. तरी तलाठी व सहायक निबंधक (नोंदणी) यांना हातशी धरुन पडवी गावच्या तिघांनी ही जमिन कागदपत्रांवर खाडाखोड करुन खरेदी केलेली दाखविली आहे., असा फिर्यादीचा मुख्य आरोप आहे.

सासवड (ता. पुरंदर) येथील दुय्यम निबंधक (नोंदणी) कार्यालय येथे 20 जुलै रोजी हा व्यवहार व नोंद झाली. त्यामुळे हा फसवणुकीचा गुन्हा म्हणून भा. द. वि. क. 420,34 कलमानुसार सासवड पोलीस ठाण्याने काल ता. 12 रात्री नोंदवून घेतला आहे. कामाजी सिध्दु हाके (वय 45, व्यवसाय शेती व मेंढपाळ, रा.चौधरवाडी ता.बारामती) यांनी याबाबत लेखी फिर्याद दिली आहे. त्यानुसार या गुन्ह्यातील संशयित आरोपी किरण लक्ष्मण जगताप, नंदकुमार टेंगले, संजय टेंगले (सर्व रा. पडवी, ता. दौंड, जि. पुणे) हे आहेत. याबाबत पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी आज माहिती दिली.

हेही वाचा: पुण्यात महापौर आमचाच होणार - खासदार संजय राऊत

फिर्यादी कामाजी सिध्दु हाके हे जमिनीचे मुळ मालक व या प्रकरणातील फिर्यादी असून त्यांनी फिर्यादीत म्हंटले आहे की., मौजे कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील गट क्रमांक 46 मधील 19 एकर 20 गुंठे हे क्षेत्र मी स्वतः श्रीमती शोभा राजेंद्र वाघमारे, सौ. माया राजेंद्र गायकवाड, सौ. शोभा अभिजीत डोंगरे व सौ. वृषाली स्वप्नील हुंबरे (सर्व रा. करंजे, ता. बारामती) यांना पूर्वीच विकलेले होते. मात्र त्यानंतर किरण लक्ष्मण जगताप, नंदकुमार टेंगले, संजय टेंगले (रा. पडवी, ता. दौंड) यांनी कर्नलवाडीच्या गावकामगार तलाठ्यास तसेच सासवडच्या दुय्यम निबंधक कार्यालयास हाताशी धरून किंवा त्यांच्याशी संगनमत करून 7/12 (सात - बारा) उता-यावर खाडाखोड व बदल करून सदरचे हे संबंधीत क्षेत्र.. हे पुनर्वसनासाठी व लाभक्षेत्रासाठी राखीव असतानाही, त्यासाठी लागनारी शासनाची कोणतीही परवानगी न घेता., सदरचे जमीन क्षेत्र खरेदी करून घेतले. हा प्रकार बेकायदेशिर असताना, त्यांनी मला अंधारात ठेवले आणि जमीन गट क्रमांक 46 च्या संबंधीत क्षेत्र व्यवहारास माझी संमत्ती नसताना, हे जमीन क्षेत्र खरेदी करून.. किरण लक्ष्मण जगताप, नंदकुमार टेंगले, संजय टेंगले यांनी माझी संगनमताने फसवणुक केली. म्हणुन माझी त्यांच्या विरूध्द माझी फिर्याद आहे. याबाबत पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्दर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुप्रिया दुरंदे या तपास करीत आहेत.

loading image
go to top