esakal | पुण्यात महापौर आमचाच होणार - खासदार संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊत

पुण्यात महापौर आमचाच होणार - खासदार संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीत राजकीय गणित बदललेली असतील, पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा प्रयत्न करू. पुढचा महापौर आमचाच असेल. असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले

हेही वाचा: TATA मोटर्सच्या शेअर्सची कोटीच्या कोटी उड्डाणे

राऊत यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, ‘‘आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढणार आहोत. महाराष्ट्रात सध्या ठाकरे- पवार पॅटर्नचाच बोलबाला, हा पॅटर्न महाराष्ट्रातील चलनी पॅटर्न आहे. पण पुण्यात शिवसेनेचा महापौर आत्तापर्यंत झालेला नाही याची खंत आहे, पण तो यावेळी पाहायला आवडेल.''

'अजून यौवनात मी' हे नाटक खूप गाजले होते. देवेंद्र फडणवीस यांना अजूनही अधून मधून मुख्यमंत्री व्हावे वाटते. त्यांनी त्यांच्या स्वप्नात रममाण व्हावे. पण रममाण होताना पंखात बळ असावं लागत. फडणवीसांना अधिक बळ मिळो आणि त्यांच आयुष्य स्वप्न बघण्यात जावो, ही माझी त्यांना शुभेच्छा आहे असे टोला राऊत लगावला. भाजपमध्ये गेल्याने त्यांना शांत झोप लागते हे हर्षवर्धन पाटील यांचे वक्तव्य वाचले, भाजपमध्ये गेल्याने चौकशीचा ससेमिरा मागे लागत नाही यात सगळ काही आलं'', अशी टीकाही राऊत यांनी केली.

हेही वाचा: जेव्हा आपलं मन कुठेच रमत नाही, तेव्हा...

सावरकरांना भारतरत्न कधी देणार?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे पूर्वीच सांगितले आहे. आता मोहन भागवत सांगत आहेत ते काही नवीन नाही. संघाला, मोहन भागवतांना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल प्रेम आलं असेल तर त्याचे स्वागत आहे, पण त्यांना भारतरत्न देऊन सन्मान कधी देणार हे ही सांगितले पाहिजे. तुरुंगात खितपत पडण्याऐवजी बाहेर येऊन कार्य करावं असे सावरकरांना वाटले त्याला माफी म्हणता येणार नाही. सावरकरांनी कधीही इंग्रजांची माफी मागितलेली नाही.

loading image
go to top