बालकास गाडी चालविण्यास दिल्याने दोघांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

बनावट नंबर प्लेट असलेले वाहन अल्पवयीन बालकास चालवित होते. त्यास चांदनी चौकात पकडले. त्या मुलाच्या चुलत्याला ताब्यात घेऊन वडील व चुलत्याच्या विरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

वारजे माळवाडी - नवीन दुचाकीची नोंदणी 5 (रजिस्ट्रेशन) न करता बनावट नंबर टाकून आठ महिने गाडी वापरली. तसेच ते वाहन आपल्या अल्पवयीन बालकास चालवण्यास दिल्याबद्दल वडील, चुलत्याला बुधवारी अटक करण्यात आली. 

धनंजय हनुमंत बनसोडे (रा.सुर्यादत्त कॉलेज, संतोष दगडी चाळ) व करण हनमंत बनसोडे यांना नवीन गाडीची परिवहन प्रादेशिक कार्यालयात (आरटीओ) नोंदणी न करता मागील आठ महिन्यापूर्वी बनावट नंबर लावून ती चालवित आहे. बनावट नंबर प्लेट असलेले वाहन अल्पवयीन बालकास चालवित होते. त्यास चांदनी चौकात पकडले. त्या मुलाच्या चुलत्याला ताब्यात घेऊन वडील व चुलत्याच्या विरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे यांनी सांगितले. 

रस्ता वाहतूक सुरक्षा पंधरवडा सुरू असल्याने चांदणी चौक येथे फौजदार सुबराव लाड, पोलिस हवालदार तानाजी नांगरे, पोलिस नाईक अविनाश गोपनर, पोलिस नाईक किरण पवार, रविंद्र अहिरे, योगेश वाघ, सुजय
पवार प्रबोधन व कारवाई करीत होते. त्यावेळी लहान मुलगा MH 12 PR 0789  या क्रमांकाची अॅक्टीवा गाडी चालवत होता. त्याला थांबवून त्याचेकडे त्याचे नाव पत्ता, वय, लायसन्स व गाडीचे कादपत्राबाबत विचारणा केली. त्याने तो सुर्यदत कॉलेज समोर, पाटील नगर बावधन येथे राहणारा असून तो 14 वर्षाचा असल्याचे सांगितले. याबाबत अधिक चौकशी केली असता. गाडीचा नंबर बनावट असल्याचे लक्षात आले. 

बनावट क्रमांक टाकून सरकारची फसवणूक करुन काही तरी गंभीरस्वरुपाची गुन्हा करण्याचे इराद्याने सुमारे 8 महिन्यांपासुन वापरत आहे. तसेच अल्पवयीन मुलास सदरच वाहन चालविण्यास दिले म्हणून हा गुन्हा दाखल केला आहे. 

लहान मुलांनी गाडी चालविणे, कारवाई सुरू
वारजे वाहतुक विभागाच्या या पथकाने चांगली कामगिरी केले आहे. रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. नागरिकांना वाहतूकीचे नियम त्यांची ओळख, माहिती जनजागृती करणे हा त्यातील उद्देश आहे. वाहतूक सुरक्षित होण्याची जबाबदारी फक्त वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन कार्यालयाची जबाबदारी नाही. पालक नागरिकांनी देखील नियम पाळले पाहिजेत. दुचाकी, चारचाकी वाहन लहान मुले वाहन चालविण्यास दिले जाते. अशाप्रकारे लहान मुलांनी गाडी चालविली असल्यास त्याच्या पालकांवर कारवाई सुरू आहे. - प्रभाकर ढमाले, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग

 

Web Title: Two of the accused filed for allowed the child to drive