मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण देणारे दोन ध्येयवेडे शिक्षक...

Teachers
Teachers

कामशेत - मार्च महिन्यात कोरोनासारख्या संसर्गाची साथ पसरली अन् शाळा, महाविद्यालय, दुकाने व बाजारपेठा बंद झाल्या. लॉकडाऊनमुळे शिक्षणाची आणि शिकविण्याची अडचण भासू लागली. याच दरम्यान शासनाने लर्न फार्म होम घरातून शिका असा एक उपक्रम पुढे आणला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑनलाईन शिकण्याची आणि शिकवण्याची रूढ पुढे आली, परंतु ग्रामिण भागामध्ये अनेक विद्यार्थी यांना अपुरी उपलब्ध संसाधने, नेटवर्क, अॅनड्रॉईड मोबाईल या अडचणी डोकेवर काढू लागल्या तर अनेक शिक्षकांना ऑनलाईन अभ्यास कसा घ्यायचा याविषयी अडचण निर्माण होऊ लागल्या. यासाठी सोमाटणे येथील दोन शिक्षकांना आपल्या घरी ऑनलाईन क्लासरूम तयार केली व प्रथम शिक्षकांना ऑनलाईन शिकवण्याबाबत येणाऱ्या अडचणी व ते कसे द्यायचे याबाबत ऑनलाईन प्रशिक्षण दिले याच शिकवण्याच्या पद्धतीला आत्मसात करून मावळातील गणिताच्या दोन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना युट्यूब द्वारे गणिताची आकडेमोड शिकवायला सुरुवात केली आहे. 

सोमाटणेतील तुळजाभवानी विद्यालयाचे सुरेश सुतार व साळुंब्रेतील ग्राम प्रबोधिनी विद्यालयाचे लक्ष्मीकांत मुंडे अशी या शिक्षकांची नावे आहेत. सुतार यांच्या मनात विचार आला की आपण घरात बसून व्हिडीओ बनवावेत का? मग या विचारातून मुलांच्या मदतीने यु ट्यूब चॅनेल सुरू केले अन् या चॅनलला लर्न फॉर्म होम हेच नाव देऊन शिक्षण सुरू केले. सुतार आणि मुंडे यांना संगणकावर पीपीटी तयार करण्याचा पंधरा वर्षापासून छंद होता .या छंदाचा वापर करून सुतार आणि मुंडे यांनी पीपीटी तयार करून व्हिडीओ बनवणं असा उपक्रम सुरू केला. विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा प्रतिसाद वाढत चालला. व्हिडीओ पाठवण्याऐवजी थेट विध्यार्थ्यांना शिकवलं तर परिणामकारक ठरेल, हे दोन्हीही शिक्षकांनी  युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह लेक्चर घेण्यास सुरुवात केली. शाळेतील विद्यार्थी तसेच महाराष्ट्रातील अनेक शाळेतील विद्यार्थी मिळून आतापर्यंत दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थी जोडले गेले आहे. 

लाईव्ह लेक्चर मध्ये विद्यार्थी शिक्षकांचे फोन किंवा मेसेज येत आहे, प्रश्न पण ते विचारत आहे व केलेला अभ्यास पाठवत आहे. आपण खूप छान आणि सुंदर शिकवता तसेच एखादा भाग विविध प्रकारे समजावून सांगता अशा प्रतिक्रिया शिक्षकांच्या येऊ लागल्या. यामुळे या दोन्ही शिक्षकांचा उत्साह द्विगुणित होतो अशा प्रतिक्रिया येत आहे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून एकही दिवस खाडा न करता रोज सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत गणित भाग १ व २, इयत्ता ९ वी व इयत्ता १० वीच्या वर्गाचे विज्ञान व गणित विषयाचे ऑनलाईन तास दररोज सुरू आहे.हे दोघे शिक्षक ऐकमेकांना ऑनलाईन पद्ध्तीने तास घेण्यास व्हिडीओ तयार करण्यास मदत करत आहे, पैसे मिळावेत असा हेतू न ठेवता, आपल्या कडे असणारे ज्ञान आणि कौशल्य हे इतरापर्यंत कसे देता येईल हाच त्यांचा उद्देश आहे. यासाठी सुरेश सुतार यांच्या घराच्या वरच्या मजल्यालर ऑनलाईन काम करण्यासाठी एक खोली तयार केली असुन या ठिकाणी फक्त ऑनलाईन शिक्षणाचेच काम सुरू आहे अहोरात्र मेहनत करून आत्तापर्यंत दोनशे पेक्षा जास्त व्हिडिओ तयार करण्यात आले.

सुरेश सुतार व लक्ष्मीकांत मुंडे म्हणाले, आमचे व्हिडीओ पाहून इतरही आमचे सहकारी शिक्षक बांधव तेही चांगला प्रयत्न करून शिकतात. या माध्यमातुन मावळ तालुक्यातील सर्व शिक्षकांचे गणित व विज्ञान अध्यापक मंडळ स्थापण केले असुन ऑनलाईन काही अडचण आल्यास झुम मिटींग घेऊन त्या सोडवण्याचे प्रयत्न केले जातात.आता सध्या आमच्या या उपक्रमातून प्रत्येक विषयाची तीन ते चार प्रकरण पूर्ण होत आहेत. आम्ही घर बसल्या शाळा बंद असल्याची उणीव थोडीफार भरून काढण्याचा प्रयत्न करतोय  आणि या उपक्रमाला आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.आम्हाला यातून मिळणारे ज्ञान आणि कौशल्य पुढील काळात नक्कीच उपयोगी पडणार आहे.

सोमाटणे - येथे ऑनलाईन शिक्षण देताना शिक्षक.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com