Pune Crime News : माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

एका व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली
Two arrested for demanding ransom pune police crime
Two arrested for demanding ransom pune police crime esakal

पुणे : माथाडी कामगाराच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती.

संकेत दिलीप गवळी (वय २९, रा. सुखवानी रॉयल, विमाननगर), अरुण शंकर बोदडे (वय ४८, रा. भैरवनगर, धानोरी रोड) आणि नितीन एकनाथ कांबळे अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी संकेत गवळी आणि अरुण बोदडे या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲरो मॉल विमाननगर येथील साहित्याचे लोडिंग अनलोडींगचे काम होते. त्यावेळी नोंदणीकृत माथाडी कामगार नसतानाही तिघांकडून लोडिंग-अनलोडिंग करू न देता गाड्यांची अडवणूक केली जात होती.

तसेच, कोणतेही काम न करता एक लाख २६ हजार रुपयांची खंडणी न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार एका व्यावसायिकाने २४ जानेवारी रोजी पोलिसांकडे दिली होती. १२ ऑगस्ट २०२२ ते २५ जानेवारी २०२३ दरम्यान हा प्रकार घडला.

खंडणी विरोधी पथक-२ चे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी या तक्रारीची दखल घेत दोन पथके तयार केली. या पथकाने आरोपींना तडजोडीअंती फिर्यादीकडून २६ हजार रुपयांची खंडणी घेताना पकडले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com