esakal | रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार करणार्‍या दोघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार करणार्‍या दोघांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - रेमडेसिव्हीरचा काळा बाजार करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन इंजेक्शन, मोबाईल, एक कार असा सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

निखील बाबुराव जाधव (वय २४, रा. आंबेगाव पठार), मयुर विजय चव्हाण (वय २२ रा. वराळे, तळेगाव दाभाडे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.याबाबत औषध निरीक्षक सुहास तानाजी सावंत यांनी फिर्याद दिली.

खंडणी विरोधी पथकातील पथकातील पोलिस कर्मचारी राजेंद्र लांडगे व विवेक जाधव यांना एक महिला तिच्या साथीदारांच्या मदतीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेमडिसिवर इंजेक्शन काळ्याबाजाराने तब्बल ३७ हजार रूपयांना विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. त्यावेळी निखील जाधव व मयुर चव्हाण हे तीन रेमडेसिव्हीर इंजेक्शन विकत असताना ते तीन इंजेक्शन १ लाख ५ हजार रूपयांना देण्यास तयार झाले.

हेही वाचा: पुणे : 24 तासात 11 हजार 661 नवे रुग्ण; 159 जणांचा मृत्यू

दरम्यान आरोपींच्या काळ्याबाजाराबाबत ठोस माहिती मिळाल्यानंतर दोघांना सापळा रचून नवले ब्रिज जवळी स्टोनेक्स गॅलरी शोरूम समोरून कारसह ताब्यात घेण्यात आले. त्यांना ताब्यात घेतले असता त्यांना ते इंजेक्शन त्यांच्या साथीदार महिलेनी विकण्यासाठी दिले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून तीन इंजेक्शन, मोबाईल फोन आणि एक कार असता सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदिप बुवा, अमंलदार मधुकर तुपसुंदर, राजेंद्र लांडगें, नितीन कांबळे, विवेक जाधव, अमर पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

loading image