गजा मारणे, छोटा राजन टोळीतील दोघांना अटक

गजा मारणे, छोटा राजन टोळीतील दोघांना अटक

पुणे - गजा मारणे व छोटा राजन टोळीचे सदस्य असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल व तीन काडतुसे असा सव्वालाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. 

जमीर मोहिद्दीन शेख (वय २६, रा. भूगाव), त्याचा साथीदार अजय सुभाष चक्रनारायण (वय २३, रा. पाषाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कोथरूडमधील साई पॅलेसजवळ दोन सराईत गुन्हेगार संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलिस कर्मचारी प्रशांत पवार व सचिन गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार, सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपक निकम, उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, मच्छिंद्र वाळके, गजानन गानबोटे यांच्या पथकाने साई पॅलेसजवळील रिक्षा थांब्याजवळ सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुले, तीन काडतुसे असा सव्वालाखाचा ऐवज जप्त केला.

शेख हा मारणे टोळीतील गुंड असून त्याच्याविरुद्ध कोथरूड, उत्तमनगर पोलिस ठाण्यात गंभीर दुखापत, विनयभंग, हत्यार बाळगणे, अपहरण असे सात गुन्हे दाखल आहेत, तर चक्रनारायण हा छोटा राजन टोळीशी संबंधित आहे. तो महाराष्ट्र राज्य सर्वसाधारण माथाडी कामगार संघटनेच्या कोथरूड विभागाचा अध्यक्ष आहे. त्याच्याविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com