esakal | गुटखा वाहतूक प्रकरणी दोन जणांना अटक

बोलून बातमी शोधा

crime

नारायणगाव : गुटखा वाहतूकप्रकरणी दोन जणांना अटक

sakal_logo
By
रवींद्र पाटे ः सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : दुचाकीवरून गुटखा घेऊन निघालेल्या दोन तरुणांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून गुटखा पानमसाला, तंबाखू जन्य पदार्थ व दुचाकी असा ९३ हजार ९६० रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी स्वप्नील किसन घोडे ( वय २१) , जेठालाल जोगराणा( वय १८ दोघेही वर्षे राहणार निमगाव सावा,ता. जुन्नर) यांना अटक केली आहे.

हेही वाचा: Corona सक्रीय रुग्णांमध्ये बंगळूर अव्वल, पुणे दुसऱ्या स्थानावर

आरोपी कोल्हेमळा येथील डिंभे डावा कालव्या लगत असलेल्या रस्त्यावरून गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती.सहायक फौजदार के. डी. ढमाले, काठे यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून १८ हजार ९६० रुपये किंमतीचा गुटखा व दुचाकी असा ९३ हजार ९६० रुपये किंमतीचा माल जप्त केला.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर