Narayangav Crime : पहिलवान कैलास पवार हत्येप्रकरणी दोन जणांना अटक: आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी

नामांकित कुस्तीपटू पहिलवान कैलास उर्फ पिंटू गुलाब पवार याचा खून केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी तीन पैकी दोन आरोपींना अटक केली आहे.
wrestler kailas pawar
wrestler kailas pawarsakal

नारायणगाव - निमगाव सावा (ता. जुन्नर.) येथील नामांकित कुस्तीपटू पहिलवान कैलास उर्फ पिंटू गुलाब पवार (वय-39) याचा खून केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी तीन पैकी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींना जुन्नर न्यायालयात आज हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

चाकू हल्ला करणारा मुख्य आरोपी फरार असून त्याचा तपास सुरू आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

खून प्रकरणी मंगल मारुती पवार, प्रवीण मारुती पवार (राहणार केंदूर, ता. शिरूर) या दोन भावांना अटक करण्यात आली असून त्यांचा भाऊ मुख्य आरोपी सुनील मारुती पवार हा फरार आहे.

मयत व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. नातेवाईक असलेल्या महिलेच्या अंत्यविधीसाठी शनिवारी ते मांजरवाडी येथे आले होते. अंत्यविधी झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये चहा पाण्यासाठी थांबले असता जुन्या भांडणातून त्यांच्यात वाद झाला. मयत कैलास पवार हे हॉटेलच्या बाहेर आले असता मंगल पवार, प्रवीण पवार या दोन भावांनी त्यांना धरले. सुनील पवार यांनी कैलास पवार यांच्यावर चाकूने हल्ला केला.

त्यानंतर आरोपी फरार झाले.कैलास पवार यांना नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारा पूर्वी त्यांचा मृत्यू झाला. आरोपींना अटक करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने रवाना करण्यात आले.

तीन पैकी दोन आरोपींना पोलिसांनी केंदूर येथून अटक केली. मात्र सुनील पवार फरार झाला.दरम्यान शनिवारी रात्री पैहिलवान कैलास पवार यांच्यावर निमगाव सावा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कैलास पवार यांच्यामागे पत्नी, दोन लहान मुले व एक अपंग मुलगी असा परिवार आहे. कैलास पवार हे लोहार काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कुस्त्यांचा छंद जोपासला होता. पुणे जिल्ह्यातील यात्रा व उत्सवातील अनेक आखाडे त्यांनी गाजवले होते. नामांकित पहिलवान हरपल्याने कुस्ती शौकिना मधून हळहळ व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com