क्रिकेट बेटींगच्या पैशांसाठी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना अटक

Crime
Crime

पुणे - क्रिकेटसाठी ऑनलाईन बेटींग करणाऱ्या व बेटींगमध्ये हरलेल्या पैशांच्या मागणीसाठी एकाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत गुंडासह क्रिकेट बेटींग करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने अटक केली. क्रिकेट बेटींग व्यवहारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. न्यायालयाने आरोपींना 16 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गौरव मनोज आहुजा (रा. साठे कॉलनी, शुक्रवार पेठ) व अजय अनिल शिंदे (रा.खडक पोलिस वसाहत )असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 22 वर्षीय फिर्यादीची गौरव आहुजा नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. गौरव हा क्रिकेटसाठी बेटींग करतो. दरम्यान, लॉकडाऊननंतर झालेल्या आयपीएल क्रिकेट सामन्याच्यावेळी गौरवने फिर्यादीस त्याच्या ओळखीचे कोणी असल्यास त्यास बेटींग खेळण्यासाठी पाठविण्यास फिर्यादीस सांगितले. त्यानुसार, फिर्यादीने त्याच्या ओळखीच्या रजत ग्रोवर यास गौरवला भेटण्यास सांगितले. रजतने गौरवकडे आयपीएल क्रिकेट सामान्यासाठी अडीच लाख रुपयांची बेटींग लावली. त्यामध्ये रजत हरला. त्यानंतर गौरवने त्याच्याकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली. परंतु रजतने त्यास पैसे न देता पुण्यातुन पळ काढला. दरम्यान, गौरव आहुजाने रजत हा फिर्यादीच्या ओळखीचा असल्याने तसेच त्याने क्रिकेटच्या बेटींगमध्ये अडीच लाख रुपये हरल्याने ते पैसे फिर्यादीने द्यावेत, यासाठी त्याच्याकडे तगादा लावला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, 9 फेब्रुवारीला फिर्यादी हा त्याच्या मित्रासह विमाननगर येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. त्यावेळी गौरव आहुजा तेथे आला. त्याने फिर्यादीचा मोबाईल व पैशांचे पाकीट परस्पर उचलून घेतले. त्यावेळी त्याने फिर्यादीकडे रजतच्या पैशांची मागणी केली. तसेच गौरवने सराईत गुन्हेगार अजय शिंदे यास फोन लावून फिर्यादीकडे दिला. त्यावेळी अजय शिंदे याने फिर्यादीस रजतने हरलेले अडीच लाख रुपये तत्काळ गौरवकडे दे, अन्यथा तुझ्या सगळ्या खानदानाला गायब करतो, अशी धमकी दिली.त्यावरुन विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने या प्रकरणाचा तपास करताना आहुजा व अजय शिंदे या दोघांना अटक केली.

कोण आहे टिक-टॉक स्टार पुजा चव्हाण?

सराईत गुन्हेगार निघाला पोलिसाचा मुलगा
अजय शिंदे याचे वडील पुणे पोलिस दलामध्ये पोलिस कर्मचारी होते. शिंदे याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्यांनी त्यास घरातून हाकलून दिले होते. त्यामुळे तो सध्या कल्याणीनगर येथे राहात होता, तेथूनच तो क्रिकेटच्या बेटींगसाठीचे काम करीत होता.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com