थेऊर - जुन्या भांडणाचा राग मनात धरून चार जणांनी दोघांना धारधार शस्त्र व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना थेऊर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काळे वस्ती परिसरात शनिवारी (ता. २) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत दोघेजण जखमी झाले आहेत. तर याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणी काळभोर पोलिसांनी दोन आरोपींना तत्काळ अटक केली आहे.