कौटुंबिक न्यायालयात वकिलांच्या दोन संघटना 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

पुणे - कौटुंबिक न्यायालयातील वकिलांच्या आता दोन संघटना झाल्या आहेत. जुन्या दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनची निवडणूक पार पडत असतानाच नवीन संघटना स्थापन होऊन त्यांचीही कार्यकारिणी निवडण्यात आली. यामुळे यापुढील काळात संघटनांच्या मान्यतेचा विषय वादाचा ठरू शकतो. 

कौटुंबिक न्यायालयातील जुन्या संघटनेच्या अध्यक्षपदी ऍड. वैशाली चांदणे, उपाध्यक्षपदी ऍड. पाटील, ऍड. झाकीर मणियार यांची निवड झाली. या निवडणुकीसाठी धर्मादाय आयुक्तांनी तीन वकिलांची समिती नियुक्त केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड. दीपक बारभाई, ऍड. संग्रामसिंह देसाई, ऍड. माधवी परदेशी यांचा समावेश होता. कौटुंबिक न्यायालयाचे नवीन इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या सदस्यत्व देण्याच्या विषयावरून वादाला सुरवात झाली. या संघटनेने निवडणुकीसाठी केवळ 288 वकील मतदार ग्राह्य धरले होते. 

मंगळवारी पुणे बार असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली "फॅमिली कोर्ट ऍडव्होकेट्‌स असोसिएशन'ची स्थापना केली गेली. या संघटनेच्या अध्यक्षपदी नियंता शहा, उपाध्यक्षपदी ऍड. अभय सिरसाट, ऍड. सुप्रिया कोठारी यांची निवड केली गेली. इतर पदाधिकारीही निवडले गेले. 

Web Title: Two attorneys in Family Court