पिरंगुटला दोन पोती गुटखा जप्त

धोंडीबा कुंभार
Sunday, 22 November 2020

पिरंगुट येथील रामलाल छॉगाजी चौधरी व काळूराम पवळे यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिरंगुट : पिरंगुट (ता . मुळशी) येथील अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पुणे ग्रामीण पथकाने २, ५५०६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त  केला आहे.

जबाबदारी स्वीकारणारेच यशस्वी ठरतात; पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना मूलमंत्र

या प्रकरणी पिरंगुट येथील रामलाल छॉगाजी चौधरी व काळूराम पवळे यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर अधीक्षक विवेक पाटील, उपविभागिय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली, पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक फौजदार दत्ता जगताप , तुषार भोईटे, हवालदार राजेंद्र पुणेकर, सागर चंद्रशेखर,  प्रसन्न घाडगे यांनी आज ही कारवाई  केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामी जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाचे उघडकीस न आलेले गुन्हे उघडकीस आणणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक तसेच पौड पोलिस  ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक धुमाळ व त्यांचा कर्मचारी हे संयुक्तपणे पिरंगुट येथील घाटामध्ये गस्त घालत होते . आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुणे बाजूकडून पौड बाजूकडे एक मारुती ओमिणी  पांढऱ्या रंगाची कार (एम एच १२  एच एन ३०३८ )  ही भरधाव वेगात जात होती.

Corona Updates: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार वाढला; 24 तासांत 45 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

 संशयितरित्या जाणाऱ्या या कारला थांबवण्याचा प्रयत्न केला असता कार चालकाने आणखी भरधाव कार ती पुढे  नेली. त्यामुळे पोलिसांनी कारचा पाठलाग केला.  त्यानंतर ही कार  पिरंगुट  येथील लवळे  फाटा येथे पाठलाग करून थांबवली. या  कारमध्ये विमल पान मसाला नावाचा सुगंधी तंबाखू व गुटखा मिक्सचे ४ पोती,  १ बॉक्स आदी वस्तू सापडल्या. त्यामुळे पोलिसांनी ही  कार व १ मोबाईल व  गुटखा  असा एकूण किंमत  २५५०६० रुपये किमतीचा  मुद्देमाल जप्त केला आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two bags of gutkha seized from Pirangut