पुणे : नीलायम ते पर्वती रस्त्यावर कोसळली दोन मोठी झाडे

पांडुरंग सरोदे
सोमवार, 15 मे 2017

रस्त्यात पडलेली झाडे दूर करणे सहज शक्य नव्हते, त्यामुळे ती कापून रस्ता मोकळा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुणे : येथील नीलायम चित्रपटगृहाकडून पर्वती पायथ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन जुनी व मोठी झाडे कोसळल्याने या रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती.

झाडे नेमकी कशामुळे पडली, याचे कारण समजू शकले नाही, मात्र त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान अग्निशामक विभागाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.

रस्त्यात पडलेली झाडे दूर करणे सहज शक्य नव्हते, त्यामुळे ती कापून रस्ता मोकळा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम रात्री उशीरापर्यन्त सुरू होते. दरम्यान, रस्त्यातील अडथळे दूर करण्यात यश आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: two big trees collapse on road neelayam between parvati

फोटो गॅलरी