Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटलांविरुद्ध ब्राम्हण समाजाचे दोन उमेदवार

विनायक बेदरकर
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुणे जिल्हाध्यक्ष मयुरेश अरगडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तसेच परशुराम सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे हेदेखील थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान देत निवडणुकीच्या रिंगणात अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

कोथरूड : कोथरूड मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना ब्राह्मण समाजाचा विरोध होताना दिसत आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि परशुराम सेवा संघ यांच्यावतीने वेगवेगळे उमेदवार देऊन कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना पर्यायाने भाजपला ब्राह्मण समाजाची ताकद दाखवून देण्याचा निश्चय या संघटनांनी केला आहे.

Vidhan Sabha 2019 : भाजपची शेवटची यादी जाहीर; खडसे, तावडेंना डावलले

ब्राह्मण बहुल असलेल्या मतदारसंघात ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेधा कुलकर्णी यांचे तिकीट ऐनवेळेला कापून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे भाजप कोथरूडमधील ब्राह्मण समाज आणि इतर सर्व मतदारांना गृहीत धरून उमेदवाराची निश्चिती करत असल्याचा आरोप करीत ब्राह्मण समाज या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुणे जिल्हाध्यक्ष मयुरेश अरगडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तसेच परशुराम सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे हेदेखील थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान देत निवडणुकीच्या रिंगणात अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. हे दोघेही आज दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Vidhan Sabha 2019 : भाजपचे नाराज राष्ट्रवादीच्या संपर्कात

विश्वजीत देशपांडे हे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकापासुन अर्ज भरण्यास जाणार आहेत. मयुरेश अरगडे दशभुजा मंदिरापासून अर्ज भरण्यास जाणार आहेत. यावेळी दोघेही जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Brahmin candidates to fight against Chandrakant Patil in Kothrud for Maharashtra Vidhan Sabha elections