दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या दोन मेहुण्यांचा कोरोनाने मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या दोन मेहुण्यांचा कोरोनाने मृत्यू

तळेगाव ढमढेरे : श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील ऊस व्यापारी सतीश कुंडलिक गवारे (वय ५०) व दत्तात्रय कुंडलिक गवारे (वय ४८) या दोन सख्या भावांचा कोरोनाने बळी घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हे दोन्ही बंधू माजी आमदार स्व. रमेश वांजळे यांचे मेहुणे व त्यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या हर्षदा वांजळे यांचे ते सख्खे बंधू आणि माजी उपसरपंच सोपानराव गवारे यांचे ते पुतणे होत.(two brothers die of corona infection in talegaon)

हेही वाचा: लॉकडाउन असूनही पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगार फिरताहेत मोकाट

सतीश गवारे यांच्या मागे बहीण, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. तर दत्तात्रय गवारे यांच्या मागे बहीण, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. दोन्ही बंधूंना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. कोरोनातून वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले. तसेच बहीण हर्षदा व चुलते सोपानराव गवारे, मित्र व नातेवाईकांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. परंतु १७ व १८ मे रोजी अवघ्या १२ तासात दोघांचीही प्राणज्योत मालवली. दोन्ही सख्या भावांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात रेशनवर २४ हजार टन धान्याचे मोफत वितरण

loading image
go to top