चैन चोरीप्रकरणी दोन अट्टल चोरांना अटक, विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
चैन चोरीप्रकरणी दोन अट्टल चोरांना अटक, विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी

चैन चोरीप्रकरणी दोन अट्टल चोरांना अटक, विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विश्रांतवाडी - विश्रांतवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत कळस परिसरात महिलेची गळ्यातील ३ तोळ्याची चैन चोरी प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी ज्वेलर्स व्यापाऱ्यासह तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून ३ तोळ्याची अशी अंदाजे १ लाख रुपये किंमतीची चैन जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अटक अशोक नामदेव गंगावणे (वय ३१ वर्षे), अनिल रघुनाथ बिरदवडे (वय ३२ वर्षे) व आकाश महादेव सोनार (तिघे रा. बांदलवाडी, बारामती) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे असून यासंदर्भात हबीबा अब्दुल शेख यांनी चैन चोरीप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या कळस परिसरात दुकानाबाहेर बसल्या असतांना आरोपींनी दुचाकीवरून येऊन त्यांची गळ्यातील ३ तोळ्याची चैन हिसकावून चोरली होती. यासंदर्भात त्यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा: पुणे जिल्हा फेरफार नोंदीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

संबंधित घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विश्रांतवाडी पोलिसांनी १५०ते २०० सीसीटीव्हीजच्या फुटेज वरून चोरट्यांचा माग काढला असता संबंधित आरोपी हे बारामतीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, खडकी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश गलांडे, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पो. उ. नि. लहू सातपुते, पो. अंमलदार विजय सावंत, दिपक चव्हाण, यशवंत शिर्के, प्रफुल्ल मोरे, शेखर खराडे, संदिप देवकाते, शिवाजी गोपनर, योगेश चांगलं, विशेष पोलीस अधिकारी राज राठोड यांनी संबंधित दोन्ही आरोपीना सापळा रचून ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी संबंधित गुन्ह्याची कबुली देऊन चोरलेली चैन ही आकाश सोनार यास विकली असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर तिघा आरोपीना अटक करण्यात विश्रांतवाडी पोलिसांना यश आले. पोलीस पथकाने विशेष कामगिरी केल्याबद्दल परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.

loading image
go to top