येरवड्यात दोन मुलांचा बुडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

येरवडा - लक्ष्मीनगर येथील मातोश्री स्कूलच्या आवारात बांधकामासाठी केलेल्या खड्ड्यात सात वर्षांच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. रामनगर येथील रुद्र दत्ता भुजबळ व रुद्र रूपेश चव्हाण अशी त्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज पाहून ही माहिती दिली. मातोश्री स्कूलच्या बंद लोखंडी प्रवेशद्वाराच्या खालून सरपटत दोन्ही विद्यार्थ्यांनी आज दुपारी साडेतीनला आवारात प्रवेश केला. त्यानंतर दोघे तिथे चेंडू खेळले. त्यानंतर ते शाळेच्या आवारात बांधकामासाठी केलेल्या खड्ड्यातील पाण्यात चेंडू पडला म्हणून काढण्यासाठी गेले. त्यानंतर काठीने चेंडू काढताना ते पाण्यात पडले असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

रुद्र भुजबळ कल्याणीनगर येथील बिशप स्कूलमध्ये दुसरीत, तर रुद्र चव्हाण जे. एन. पेटीट स्कूलमध्ये दुसरीत शिकत होता. दोघेही एकुलते एक असल्यामुळे रामनगर परिसरात हळहळ पसरली. 

मुले पाण्यात पडल्यानंतर काही मुलांनी आरडाओरडा करून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवेशद्वार बंद असल्यामुळे कोणालाही हालचाल करता आली नाही. येथील कायमस्वरूपी असलेला सुरक्षारक्षक जागेवर नव्हता, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. 

Web Title: Two children dead

टॅग्स