त्या निष्पाप अभियंत्यांना न्याय द्या! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

पुणे - खराडी येथील ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या दोन संगणक अभियंत्यांच्या कुटुंबीयांना महावितरणकडून आर्थिक मदत मिळाली पाहिजे, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, असा कौल राज्यातील जनतेने दिला आहे. त्यामुळे महावितरण आणि पोलिस आता तरी दखल घेऊन या दोन अभियंत्यांच्या कुटुंबीयांना न्याय देणार का, असा सवाल उपस्थित झाला आहेत. 

पुणे - खराडी येथील ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या दोन संगणक अभियंत्यांच्या कुटुंबीयांना महावितरणकडून आर्थिक मदत मिळाली पाहिजे, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, असा कौल राज्यातील जनतेने दिला आहे. त्यामुळे महावितरण आणि पोलिस आता तरी दखल घेऊन या दोन अभियंत्यांच्या कुटुंबीयांना न्याय देणार का, असा सवाल उपस्थित झाला आहेत. 

खराडी येथील झेन्सार कंपनीसमोरील पदपथावरील ट्रान्सफॉर्मरच्या केबलचा स्फोट होऊ लागलेल्या आगीत प्रियांका झगडे आणि पंकज खुने हे दोन संगणक अभियंते गंभीर भाजले होते. 11 मे रोजी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. या दोघांवरही उपचार सुरू असताना ते मृत्युमुखी पडले. या दोन्ही अभियंत्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. 

ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झालेला नाही, त्या शेजारी असलेल्या स्टॉलवरील सिलिंडरचा स्फोट झाल्याचे सांगत महावितरणने या प्रकरणात हात वर केले होते. तसेच या प्रकरणात विद्युत निरीक्षकांनी प्रकरण दडपण्यासाठी खोटा अहवाल दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते. असे असताना पोलिसांनी थेट दोषींवर कारवाई करण्याऐवजी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात मोघम सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सोपस्कार पूर्ण केले. परिणामी या दोन्ही अभियंत्यांच्या कुटुंबीयांना महावितरणकडून नुकसान भरपाई मिळू शकली नसल्याचे प्रकरण "सकाळ'ने उघडकीस आणले होते. महावितरण आणि पोलिसांच्या या हलगर्जीपणाबद्दल इ-सकाळ, फेसबुक आणि ट्‌विटरवर पोल घेतल्यानंतर 93 टक्के नागरिकांनी महावितरण आणि पोलिसांना दोषी धरले आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि दोन्ही अभियंत्यांच्या कुटुंबीयांना महावितरणकडून आर्थिक भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. 

चार हजार जणांचा प्रतिसाद 
पुण्यात महावितरण कंपनीच्या ट्रान्स्फॉर्मरच्या स्फोटामुळे दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता. महावितरणने त्यांना आर्थिक मदत करणे तर दूरच; परंतु हे आमच्यामुळे घडलेच नाही, अशी जबाबदारी झटकली. ही महावितरणची भूमिका योग्य आहे का, याबाबतची मतचाचणी ई-सकाळ, ट्विटर आणि फेसबुक या माध्यमांतून घेण्यात आली. त्याला चार हजार 203 नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यात महावितरणला दोषी धरले आहे.

Web Title: Two computer engineers died in Transformer blast in Kharadi