पुरंदर तालुक्यात आढळले कोरोनाचे दोन रुग्ण

श्रीकृष्ण नेवसे
बुधवार, 27 मे 2020

- सुप्याच्या रुग्णाप्रमाणे दोघेही हडपसरच्या कंपनी कनेक्शनमधील

सासवड (पुणे) : हडपसरच्या एका नामांकित कंपनीमध्ये काम करणारे; पुरंदर तालुक्यातील सासवड येथील एक व जवळार्जुन येथील एक अशा दोन कामगारांचे कोरोनाचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यातून सासवड शहरात विविध दुकानांसह बाजारपेठ पूर्णतः बंद केली असून शहर व परिसराचा कंटेन्मेंट झोनमध्ये प्रवेश झाल्याचे स्पष्ट  आहे. तर तालुक्यातील बाधितांचा आकडा आता पाचवर पोचला आहे. सासवडचे प्रांत प्रमोद गायकवाड व पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी ही माहिती दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रुग्णाच्या घरातील सातजण कोविड केअर सेंटरमध्ये हलविले आहेत. पोलीस बंदोबस्तही वाढविला आहे. तसेच सासवडच्या ज्या लांडगे गल्लीत रुग्ण सापडला त्या भागाचा पुन्हा सर्व्हे सुरु केल्याचे डाॅ. किरण राऊत म्हणाले. जवळार्जुन बाबतही या उपाययोजना केल्या जात आहेत; असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, पुरंदर तालुक्यात वीर, सुपे व कोडीत या तीन गावात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने ही गावे व परीसर यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. संबंधित गावातील.. पैकी वीर नऊ, सुपे खुर्द 17 व  कोडीत बुद्रुकचे पाचजण असे 31 जण विलगीकरणात कोविड केअर सेंटरला आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सासवडची व जवळार्जुनची त्यात भर पडली आहे. विलगीकरणातील उर्वरित लोकांचेही स्वॅब तपासणीस पाठविण्यात येत आहेत. अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Corona Infected Patients Found in Purandar Saswad Pune