पंजाब नॅशनल बँकेची दोन दाम्पत्यांनी केली तब्बल 93 लाखांची फसवणुक

pnb-jobs.jpg
pnb-jobs.jpg

पुणे: फ्लॅटची बनावट कागदपत्रे तयार करुन बँकेकडे जमा करुन दोन दाम्पत्याने पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) तब्बल 93 लाख रूपयांची फसवणुक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चौघाविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्वप्निल कुदले, शिल्पा कुदले, आशिष गायकवाड, सोनाली गायकवाड (चौघेही रा.स्पाईन रोड, मोशी प्राधिकरण) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी बँकेचे मँनेजर सुजितकुमार झा (वय 50, रा. सैलिसबरी पार्क, गुलटेकडी) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

कुदले व गायकवाड दाम्पत्यास भोसरी येथील समर्थ रेसीडेन्सी येथे फ्लँट खरेदी करायचा होता. त्यासाठी त्यांनी प्रभात रस्त्यावरील पंजाब नैशनल बँकेत प्रत्येकी 46 लाख 50 हजार कर्ज प्रस्ताव सादर केला. त्यासाठी त्यांनी फ्लँटची बनावट कागदपत्रे सादर केली. कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम लाटली. अशी माहिती पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com