esakal | येरवडा : पावसाळ्यापूर्वीच्या कामांना दोन कोटी रूपये!

बोलून बातमी शोधा

Pune PMC Pune No entry
येरवडा : पावसाळ्यापूर्वीच्या कामांना दोन कोटी रूपये!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

येरवडा : कोरोनाच्या (Corona) पाश्‍वभूमीवर चाळीस टक्के विकासकामांना(Development Work) महापालिकेने (Pune Municipal Corporation) परवानगी (Permission) दिली आहे. तरी सुध्दा पावसाळ्यापूर्वीच्या (Pre-monsoon works) कामांच्या आड येरवडा क्षेत्रीय कार्यालय (Yerawada Regional Office) अंतर्गत दोन कोटी रूपयांच्या तब्बल ३९ निविदा (tender) प्रसिध्द केल्या आहेत. यामध्ये नेहमी प्रमाणे पावसाळी वाहिन्यांची देखभाल व दुरूस्ती, रस्त्यांवरील खड्डे दुरूस्ती, राडारोडा उचलणे, सांडपाणी वाहिन्यांची दुरूस्ती, सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती, विद्युत विषयक (electrical work) कामांसह दिशा दर्शक फलक (Directional panel) बसविणे इत्यादी कामांचा समावेश आहे. (Two crore rupees for pre-monsoon works)

हेही वाचा: 'आमचे दोन्ही देव चोरीला गेले हो...' दोन्ही मुले गमावलेल्या ज्येष्ठ मातापित्यांचा टाहो

येरवडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत धानोरी, विश्रांतवाडी, कळस ( प्रभाग क्रमांक १), नागपूरचाळ, टिंगरेनगर, फुलेनगर (प्रभाग क्रमांक २) तर येरवडा (प्रभाग क्रमांक ६) अशा तीन प्रभागांचा समावेश होतो. अशा तीन प्रभागातील पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आड इतर कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. यामध्ये सांडपाणी, पावसाळी वाहिन्यांची(Rainwater Harvesting) देखभाल व दुरूस्ती, रस्त्यावरील खड्डे दुरूस्ती, राडारोडा उचलणे, सार्वजनिक शौचालय(Public Toilets) दुरूस्तीवर दोन लाख रूपयांपासून ते सात लाख ७८ हजार रूपयां पर्यंतच्या कामांच्या निविदा काढल्या आहेत.

येरवडा, धानोरी,कळस क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत महापालिकेने समाजमंदिर, शाळा, दवाखाने व शाैचालय याठिकाणी विद्युत विषयक कामे व केबल बदलण्यासाठी कामांसाठी १७ लाख ८४ हजार रूपयांची निविदा तर दिशा दर्शक फलकांच्या रंगरंगोटी, रेलींग व दुभाजक दुरूस्तीसह राडारोडा उचलणे अशा कामांच्यासाठी लाखो रूपयांची कामे

हेही वाचा: 20 दिवसानंतर पुण्यात पेट्रोल-डिझेल महागलं; पाहा आजचे दर

‘‘पावसाळ्यापूर्वीची कामे करणे आवश्‍यक आहे. पावसाळी गटारे, सांडपाणी वाहिन्यांची देखभाल व दुरूस्ती, रस्त्यावरील खड्डे बुजविणे व त्यावरील राडारोडा काढणे आदी कामे करायची आहेत. त्यामुळे ३९ निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.’’

- संजय गावडे, उपायुक्त, परिमंडळ विभाग क्रमांक १

स्मार्ट शौचालय नावालाच

''गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणा अंतर्गत स्मार्ट शाैचालय म्हणून निवडक सार्वजनिक शाैचालयांमध्ये वॉश बेसीन, आरसा, हॅण्ड वॉश, पंखे बसविण्यात आले होते. मात्र सर्वेक्षण होताच या सर्व वस्तू चोरीला जातात म्हणून आरोग्य अधिकाऱ्यांनी त्या काढून ताब्यात घेतल्या. या वस्तूंचे पुढे काय झाले याबाबत शंका उपस्थित केली असता चौकशी करून सांगतो'', असे संजय गावडे यांन सांगितले.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा