चिंचवडमध्ये रेल्वेखाली सापडून दोघांचा मृत्यू

Railway
Railway

पिंपरी - चिंचवड रेल्वे स्टेशन येथे गुरुवारी (ता. ८) पहाटेच्या धावत्या रेल्वेखाली सापडून दोघांचा मृत्यू झाला.

लोहमार्ग पोलिस ठाण्यातील हवालदार लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ लोहमार्गावर पहाटे साडेबाराच्या सुमारास एक मृतदेह आढळला. मयत व्यक्‍तीचे वय अंदाजे ५५ वर्षे असून उंची साडेपाच फूट, अंगाने मजबूत, केस पिकलेले असे वर्णन आहे. त्याने अंगात राखाडी पॅंट आणि हाफ बनियन आहे. 

दुसरी घटना चिंचवड ते आकुर्डीदरम्यान लोहमार्गावर पहाटे पावणेएकच्या सुमारास घडली. मयत व्यक्‍तीचे वय अंदाजे २५ ते ३० वर्ष आहे. उंची साडेपाच फूट, गहूवर्ण आहे. त्याच्या अंगात काळा फूल बाह्यांचा शर्ट, निळी जिन्स आहे. या दोन्ही मयत व्यक्‍तींकडे ओळख पटेल अशी कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत. माहिती असल्यास त्यांनी चिंचवड लोहमार्ग चौकीशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com