भक्ती-शक्ती चौकात भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

शुक्रवारी (ता. 31) रात्री दहाच्या सुमारास लोंढे, खान व कांबळे हे जुन्या मुंबई पुणे महामार्गाने एकाच दुचाकीवरून देहूरोडहुन निगडीच्या दिशेने येत होते. दरम्यान, ते भक्ती शक्ती चौकजवळ आले असता भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरात धडक दिली.

पिंपरी : भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना निगडीतील भक्ती शक्ती चौकाजवळ घडली. 

हरित लवादाचा पिंपरी महापालिकेला दणका: दिला 'हा' आदेश

सौदागर दशरथ लोंढे ( वय 27),  ऐश मोहम्मद खान ( वय 23 , दोघे रा. मोरेवस्ती, चिखली) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर ज्ञानेश्वर दत्तू कांबळे (वय 26, मोरेवस्ती, चिखली) हे गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे : कोंढव्यात डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या

शुक्रवारी (ता. 31) रात्री दहाच्या सुमारास लोंढे, खान व कांबळे हे जुन्या मुंबई पुणे महामार्गाने एकाच दुचाकीवरून देहूरोडहुन निगडीच्या दिशेने येत होते. दरम्यान, ते भक्ती शक्ती चौकजवळ आले असता भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील लोंढे व खान यांचा मृत्यू झाला. तर कांबळे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाच्या आधारे कंटेनरचा शोध घेत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two die in container collision near bhakti shakti chowk nigdi