esakal | बारामतीतील दोघांचा कोरोनाने मृत्यू; प्रशासन अपयशी ठरतंय का?
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

आज कोरोनाने एकाच दिवशी सात जणांचा मृत्यू झाला आहे. या पैकी दोन रुग्ण बारामतीतील होते तर इंदापूर तालुक्यातील तीन, दौंड व कर्जत मधील एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला. 

बारामतीतील दोघांचा कोरोनाने मृत्यू; प्रशासन अपयशी ठरतंय का?

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : आज कोरोनाने एकाच दिवशी सात जणांचा मृत्यू झाला. या पैकी दोन रुग्ण बारामतीतील होते तर इंदापूर तालुक्यातील तीन, दौंड व कर्जत मधील एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला. 

देशाचा जलखजिना आता एकाच क्लिक वर

या पैकी रुई कोविड हेल्थ सेंटरमध्ये बारामतीतील भिगवण रस्त्यावरील ज्येष्ठ नागरिकाचा तसेच इंदापूर तालुक्यातील तिघांचा असे चार मृत्यू झाले. तर बारामती हॉस्पिटलमध्ये बारामतीतील एक महिला तसेच कर्जत व वासुंदे येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

एकाच दिवशी सात मृत्यू कोरोनाने झाल्यामुळे आज प्रशासनही हादरुन गेले आहे. बारामतीतील कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा आता 20 वर गेला आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न होत असूनही मृत्यूदर कमी करणे प्रशासनाला शक्य होत नाही अशी स्थिती आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या संपर्कातील अनेक जण कोरोना पॉझिटीव्ह निघत आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तो पर्यंत बारामतीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 291 पर्यंत गेला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गर्दी रोखण्यासाठी प्रयत्न हवेत-
विशिष्ट रस्ते व भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गासह समूह संसर्गाचाही धोका होऊ शकतो. त्या मुळे गर्दी कमी करण्यासह जेथे गर्दी होते तेथे उपाययोजना करण्याची आता गरज निर्माण होऊ लागली आहे. प्रशासनाने आता या बाबत काहीतरी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. दररोजचा येणारा आकडा धडकी भरवणारा असल्याने गर्दी कमी करण्यासह इतरही उपाययोजना हाती घेण्याची मागणी होऊ लागली आहे. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)