पुण्यातील दोन डॉक्टरांकडून पाच कोटींचा गंडा

संदीप जगदाळे
गुरुवार, 11 मे 2017

हडपसर (पुणे) ओझिरिच व अमग्झ या दोन बोगस अॅनलाईन कंपन्याच्या माध्यमातून सातारा शहर व जिल्हयातील 100 हून अधिक जणांची पाच कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर येथील दोन डॅाक्टरांविरूध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा तपासासाठी हडपसर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

हडपसर (पुणे) ओझिरिच व अमग्झ या दोन बोगस अॅनलाईन कंपन्याच्या माध्यमातून सातारा शहर व जिल्हयातील 100 हून अधिक जणांची पाच कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर येथील दोन डॅाक्टरांविरूध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा तपासासाठी हडपसर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

डॉ. निरंजन वेताळ जाधव व डॉ. गणेश माने (दोघे रा. अमनोरा टाउनशिप, हडपसर, पुणे) या दोघांवर फसवणूक व आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हिम्मत बाजीराव कणसे (वय 52, रा. विकासनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान 6 मे रोजी जाधव हे बेपत्ता झाल्याबाबातची तक्रार त्यांच्या पत्नीने हडपसर पोलिस ठाण्यात दिली आहे.

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विष्णू पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार 2016 मध्ये डॉ. जाधव व डॉ. माने यांनी ओझेरिच नावाची कंपनी सुरू केली असल्याचे व्हॉटस् अ‍ॅपवर सांगून तसा ग्रुप तयार केला. या कंपनीच्या माध्यमातून जीन्स पँट, लेगीज, साड्या, भांडी, झुंबर, फर्निचर, भाज्या व इतर साहित्य खरेदी-विक्रीच्या डील सुरू केल्या असल्याचे सांगितले. तसेच या योजनेत ज्यांनी गुंतवणूक करावयाची आहे, अशांनी 10 हजार रुपये हडपसर येथील बँकेत जमा केल्यास 3 महिन्यांमध्ये साहित्य खरेदी न करता 20 हजार रुपये मिळतील असे सांगितले. याशिवाय ज्यादा रक्कम गुंतवल्यास ज्यादा फायदाही मिळेल, असेही मेसेज त्यांनी व्हॉट्सअपवर पाठवले.

प्रारंभी कंपनीकडून तुळशीचे बी दिले जायचे. त्यातून दर तीन महिन्यांना वाढलेली तुळशीची रोपे डॉक्टर घेवून जात व त्याबदल्यात भरघोस पैसे गुंतवणूकदारांना देत होते. त्यामुळे सातारा येथील तुळशीचे उत्पन्न घेणार्‍या लोकांचा कंपनीवर विश्‍वास बसला. त्यामुळे अनेकांना या योजनेत गुंतवणूक केली. गुंतवणूकीचे पैसे डॉ. जाधव याच्या खात्यावर लोकांनी भरले. सुरुवातीला या माध्यमातूनही काही लोकांना फायदा झाला. त्यामुळे मोठ्या रकमांची गुंतवणूक होत गेली.

हा सर्व प्रकार सुरु असतानाच संशयित दोघांनी मार्च 2017 मध्ये अमग्झ नावाची कंपनी काढली. या कंपनीचे सभासद होण्यासाठी 2 लाख रुपयांचा शेअर्स व ट्रेनिंगसाठी 50 हजार रुपये भरण्याचे सांगण्यात आले. संबंधित रक्कम भरल्यानंतर प्रत्येक महिन्याला कंपनी 44 हजार रुपये याप्रमाणे असे सहा महिने देणार होती. याशिवाय अडीच महिन्याने आणखी काही रक्कमही सभासदांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबतचे ट्रेनिंगही खराडी, पुणे येथील हॉटेल प्रिमीअर इन येथे आयोजित करण्यात आले होते. हजारो लोकांनी या कंपनीमध्येही अडीच लाख रुपयांप्रमाणे पैसे गुंतवले. मात्र वेळेत कोणतेही पैसे न मिळाल्याने गुंतवणूकदारांना संशय आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. पुढील तपास गुन्हे पोलिस निरिक्षक अंजूमन बागवान करत आहेत.

Web Title: two doctor arrested in pune