
पिंपरी : पोलिस असल्याची बतावणी करून रोकड लुटणाऱ्या दोन तोतया पोलिसांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार काळेवाडी येथे घडला. आशिष अशोक खरात (वय 24, रा. इंद्रलोक कॉलनी, लिंक रोड, चिंचवड), मिलिंद अशोक सूर्यवंशी (वय 24, रा. श्री दत्त कॉलनी, थेरगाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अतिष चंद्रकांत भोसले (रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
लघुशंकेसाठी थांबले अन् 5 जणांसाठी टेम्पो ठरला कर्दनकाळ
शुक्रवारी (ता 28) रात्री साडे आठ वाजता फिर्यादी हे काळेवाडीतील एम्पायर इस्टेट पुलाजवळ उभे होते, त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. पोलिस असल्याची बतावणी करून फिर्यादीकडील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी रात्री पावणे दहाच्या सुमारास पुष्पेंद्र कोमलप्रसाद गौतम (वय 24, रा थेरगाव) हे उभे असताना त्यांच्या कडील देखील पाच हजार रुपये आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतले. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.