पुणे: हडपसर भागातील 'त्या' दोन कुटुंबांचा अखेर लागला शोध

राजेंद्रकृष्ण कापसे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पोलिसांनी शोध घेतला असता दोन्ही कुटूंबीय सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही कुटूंबीय, शिरकोली गावात मोबाईल रेंज नसल्याने नातेवाईकांशी या कुटूंबियांचा मोबाईलवर संपर्क झाला नव्हता. शिरकोली गावातील गुंजन फार्म हाऊसमध्ये सातव आणि मगर कुटूंबीय मुक्कामाला थांबली होती.

पुणे / खडकवासला :  हडपसर येथील सातव व मगर कुटुंबीयांचा अखेर आज (गुरुवार) शोध लागला आहे. बुधवार सकाळपासून सात जणांपैकी पाच जणांचे फोन बंद होते. नातेवाईकांनी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आज (गुरुवार) सकाळी त्यांचा शोध लागण्यात यश आले. वेल्हे तालुक्यातील शिरकोली या गावात सातव आणि मगर कुटूंबीय मुक्कामाला थांबली होती.

शहराच्या पूर्वभागातील हडपसर परिसरात राहणाऱ्या दोन कुटुंबांशी काल बुधवार पासून संपर्क होत नव्हता. मगर आणि सातव कुटुंबातील सात जण एकाएकी संपर्कात नसल्याने या कुटुंबीयांचे नातेवाईक काळजीत आहेत. सिद्धार्थ उर्फ हरीश सदाशिव मगर (38 वर्षे) त्यांची पत्नी स्नेहल उर्फ ईश्वरी मगर, जुळ्या मुली – आरंभी आणि सायली (5 वर्षे) त्यांचे मित्र जगन्नाथ हरी सातव पत्नी आणि त्यांचा पाच वर्षाचा मुलगा असे सात जणांचा संपर्क होत नाही, अशी तक्रार हवेली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. 

पोलिसांनी शोध घेतला असता दोन्ही कुटूंबीय सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही कुटूंबीय, शिरकोली गावात मोबाईल रेंज नसल्याने नातेवाईकांशी या कुटूंबियांचा मोबाईलवर संपर्क झाला नव्हता. शिरकोली गावातील गुंजन फार्म हाऊसमध्ये सातव आणि मगर कुटूंबीय मुक्कामाला थांबली होती.

सिद्धार्थ उर्फ हरीश मगर आणि जगन्नाथ हरी सातव हे दोघं जमिन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. ते आपल्या कुटुंबासह मंगळवारी खडकवासला, पानशेतला फिरायला गेले होते. त्यांनी खडकवासलापासून चार- पाच किलोमीटरवर असलेल्या मधील अॅक्वेरियस हॉटेलात मुक्कामही केला होता. सिद्धार्थ मगर यांच्या पत्नीचं बहिणीशी फोनवरुन बुधवारी दुपारी 11 वाजता बोलणं झालं होतं. मात्र काल (बुधवारी) दुपारी 11 वाजल्यापासून या दोन्ही कुटुंबांकडे असलेले पाच मोबाईल नंबर बंद लागत होते. 

Web Title: two families missing in Hadapsar area in Pune