esakal | नसरापूर येथे वीज कोसळून दोन मुली जागीच ठार, एक जखमी

बोलून बातमी शोधा

lightning strike
नसरापूर येथे वीज कोसळून दोन मुली जागीच ठार, एक जखमी
sakal_logo
By
किरण भदे, नसरापूर

नसरापूर : नसरापूर चेलाडी येथील आदिवासी कातकरी वस्ती वरील तीन लहान मुली वस्ती जवळ खेळत असताना वादळ वारयासह आलेल्या पावसातुन विज कोसळुन तीन मधील दोन लहान मुलींचा जागीच मृत्यु झाला तर एक किरकोळ जखमी झाली आहे या दुर्घटनेने येथील आदिवासी कातकरी वस्तीवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. सिमा अरुण हिलम (वय 11),अनिता सिकंदर मोरे (वय 9) व चांदणी प्रकाश जाधव (वय 9) या तिघी त्यांच्या कातकरी वस्ती जवळील छोट्या टेकडीवरील मोठ्या दगडा जवळ खेळत असताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आभाळ भरुन येऊऩ गडगडत होते या दरम्यान विजांचा मोठा आवाज होत एक विज मुली खेळत असलेल्या दगडा जवल पडली या मध्ये सिमा हिलम व अनिता मोरे या दोघी जागीच ठार झाल्या तर चांदणी प्रकाश जाधव ही मुलगी किरकोळ जखमी झाली.

हेही वाचा: पुणे : पोलिसांच्या तत्परतेने वाचले २० रुग्णांचे प्राण

प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची माहीती देताना सांगितले कि, यामुली वस्ती जवळच खेळत होत्या पाऊस भरुन आल्यावर मुलींच्या घरातील कुटुंबीयांनी त्यांना लवकर घरात या असा आवाज दिला तो पर्यंत विजेचा मोठा आवाज झाल्याने वस्ती वरील सर्वजणच घाबरुन पहायला बाहेर आले तर या खेळणारया तीन मुली उंच उडुन खाली पडत असल्याचे दिसले वस्ती वरील तरुण पोरांनी ताबडतोब तिकडे धाव घेतली मात्र सिमा व अनिता यांना जोरदार धक्का बसल्याने त्या जागीच मरण पावल्या होत्या तर चांदणी बेशुध्द झाली होती तिंघींनाही तातडीने येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले परंतु डाँक्टरांनी दोघीं जागीच मृत झाल्याचे सांगितले.

हेही वाचा: पिंपरी ; ‘मोफत बेड’साठी मागितले एक लाख