वरवंडला बिबटयाची पुन्हा धुडगूस; हल्लासत्र सुरुच

Two goats killed again by leopard in warwand Daund
Two goats killed again by leopard in warwand Daund
Updated on

वरवंड(पुणे) : वरवंड (ता.दौंड) परिसरात बिबटयाचे पाळीव प्राण्यांवरील हल्ला सत्र सुरुच असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पाच दिवसापुर्वी पासोडी भागात बिबटयाच्या हल्ल्यात कालवडीचा मृत्यू झाल्या होता. त्यानंतर काही अंतराच्या फरकावर बिबटयाने काल(ता.5) आणि आज (ता.6) सलग दोन दिवस मेंढयां व शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला. यामध्ये दोन मेंढया व दोन बोकडांचा मृत्यू झाला. वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबटयाला जेरबंद करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मागील आठवडयात वरवंड हद्दीतील रेल्वेस्थानकाच्या दक्षिण भागात बिबटयाने शिरकाव केला होता. यावेळी अनेकांना बिबटयाचे दर्शन घडले. पासोडी भागात बिबटयाने नामदेव दिवेकर यांच्या घरासमोरील कालवडीवर हल्ला करुन तिला फस्त केली. त्यानंतर नागरीकांनी सुरक्षितेच्या दृष्टीने रात्रीची गस्त देण्यास सुरुवात केली. त्यामुळे बिबटयाने त्या भागात काढता पाय घेतला.

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा  

मंगळवारी बिबटयाने दोन किलोमीटर दक्षिणबाजुस येत बारवकरवस्तीच्या शिवारात चांगलाच धुमाकुळ घातला. बिबटयाने सकाळी सहा वाजता संभाजी पिसे यांच्या घरासमोरील वाघरीतील मेंढयाच्या कळपावर हल्ला केला. आवाज येताच पिसे त्यांनी बाहेर येवून पाहताच बिबटया वाघरीत दिसुन आला. त्यानंतर बिबटया बाजुच्या डाळींबीच्या बागेत पसार झाला. यावेळी दोन मेंढयांचा मृत्यू झाला. यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱयांनी घटनास्थळी पाहणी केली.

त्यानंतर बिबटयाने (आज) बुधवारी सकाळी नऊ वाजता पुन्हा धुडगुस घातला. विनोद गायकवाड यांच्या घरासमोरील शेळ्यांवर हल्ला केला. यावेळी दोन बोकडांचा मृत्यू झाला. याबाबत माहीती मिळताच वनविभागाचे वनरक्षक शशिकांत सावंत, वनकर्मचारी भरत शितोळे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सकाळी भऱदिवसा बिबटयाचा हल्ला पाहून परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरु आहे. रात्रीच्या वेळी शेतकऱयांना पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. बिबटयाची दहशत वाढत चालल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. दरम्यान,बिबटयाची दहशत वाढत चालली आहे. शेतकऱयांनी पाळीवर जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावी. शेतकऱयांनी शेतात जाताना विशेष काळजी घ्यावी. लहानमुलांना एकटे फिरुन देवू नका. असे आवाहन वनविभागाने केले आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com