
Pune Kharadi Crime : पुण्यातील खराडी आयटीपार्क परिसरातील एका चौकात भर पावसात काही लोकांमध्ये हाणामारी सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. चौकातच वाहन थांबवून एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार इथून जाणाऱ्या एका कारचालकानं आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. पण आयटीपार्कसारख्या भागात असा गुंडगिरीचा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.