शेतातील माती विकल्यावरून बाचाबाची आणि मारहाण 

दत्ता म्हसकर
सोमवार, 21 मे 2018

जुन्नर - आपटाळे ता जुन्नर येथे शेतातील माती विकल्याच्या कारणावरून शनिवारी ता.19 रोजी सायंकाळी बाचाबाची व मारहाण झाली. या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप पांडुरंग उत्तर्डे यांनी सात जणांविरुद्ध जुन्नर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

जुन्नर - आपटाळे ता जुन्नर येथे शेतातील माती विकल्याच्या कारणावरून शनिवारी ता.19 रोजी सायंकाळी बाचाबाची व मारहाण झाली. या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप पांडुरंग उत्तर्डे यांनी सात जणांविरुद्ध जुन्नर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप पांडुरंग उत्तर्डे यांनी गणेश सदाशिव उत्तर्डे, सदाशिव सिताराम उत्तर्डे, माणिक सदाशिव उत्तर्डे, लता गणेश उत्तर्डे, हरीभाऊ सिताराम उत्तर्डे, चंदुबाई हरीभाऊ उत्तर्डे, उषाबाई कचरू देवाडे, सखुबाई मारूती उत्तर्डे सर्व रा.आपटाळे ता. जुन्नर या सात जणांचे विरूध्द तक्रार दाखल केली आहे. त्यांनी शेतातील मातीची विक्री केल्याबाबत तहसीलदार कार्यालयात तक्रार अर्ज केला होता. तसेच या प्रकाराची चौकशी करण्यास भाग पाडल्याच्या कारणावरून मारहाण केली असल्याची फिर्याद संदीप उत्तर्डे यांनी जुन्नर पोलिसांकडे दिल्याने वरील सात जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस हवालदार खंडागळे करीत आहेत.

आपटाळे येथील सदाशिव सीताराम उत्तर्डे यांनी त्यांच्या शेतातील माती कुंभारांना विटा करण्यासाठी विकली. त्याचा महसूल कर्मचारी पंचनामा करत असताना सदाशिव उत्तर्डे यांना संदीप पांडुरंग उत्तर्डे यांनी दमदाटी करून शिविगाळ केली. दगड फेकून मारले तसेच त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाड मारून जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सदाशिव उत्तर्डे यांच्या नातेवाईकांना देखील त्यांनी शिवीगाळ करत दगड फेकुन जखमी केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस.आर. दिवटे करत आहेत. 

Web Title: two had a Fight because of selling soil