IAF Recruitment 2021: १२वी पास उमेदवारांनो, एअरमन पदांसाठी निघाली भरती!

टीम ई-सकाळ
Tuesday, 12 January 2021

उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत ऑनलाइन चाचणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणीचा समावेश आहे.

IAF Recruitment 2021: पुणे : भारतीय वायुसेनेने (आयएएफ) ग्रुप एक्स आणि ग्रुप वाय ट्रेडमध्ये एअरमन भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र अविवाहित पुरुष उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. २२ जानेवारीपासून अधिकृत वेबसाइट airmenselection.cdac.in किंवा careerindianairforce.cdac.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ फेब्रुवारी २०२१ आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर संबंधित पात्रतेबद्दल तपशीलवार माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तपशीलवार माहिती पाहू शकता.

DRDO Jobs: तरुण-तरुणींनो, कोणतीही परीक्षा न देता मिळवा नोकरी​

महत्त्वाच्या तारखा -
- ऑनलाइन अर्ज प्रारंभ तारीख : २२ जानेवारी २०२१
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : ७ फेब्रुवारी २०२१
- ऑनलाईन परीक्षेची तारीख : १८ एप्रिल ते २२ एप्रिल २०२१

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा -
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्ड / संस्थेमधून किमान ५० टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहितीसाठी अधिसूचना पाहू शकता. त्याचवेळी उमेदवाराचा जन्म १६ जानेवारी २००१ ते २९ डिसेंबर २००४ दरम्यान झालेला असावा.

 UPSC Recruitment 2021: सहाय्यक प्राध्यापक आणि संचालक पदासाठी निघाली भरती​ 

निवड प्रक्रिया -
उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत ऑनलाइन चाचणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणीचा समावेश आहे. परीक्षा पॅटर्नच्या सविस्तर माहितीसाठी आपण अधिसूचना पाहू शकता.

असा करा अर्ज
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. ऑनलाईन अर्जासाठीची लिंक वेबसाइटवर २२ जानेवारी २०२१ पासून सक्रिय होईल. सकाळी १० वाजेपासून उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.

UPSC CDS(I) 2021: कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसचं ऍडमिट कार्ड प्रसिद्ध; लगेच करा डाउनलोड​

परीक्षा शुल्क -
- उमेदवारांना परीक्षा शुल्क म्हणून 250 रुपये भरावे लागतील.

प्रवेशपत्र ४८ ते ७२ तासांपूर्वी दिले जाईल. उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर परीक्षेच्या तारखेच्या ४८ ते ७२ तासांपूर्वी पाठविली जातील. प्रवेशपत्र अधिकृत पोर्टल airmenselection.cdac.in वर उपलब्ध होईल. उमेदवार अधिकृत पोर्टलवर जाऊन ते डाउनलोड करू शकतील.

- अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा
- अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ►
 क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Air Force Recruitment 2021 How to apply for Airmen in Group X and Group Y Trades