पुणे : मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये झालेल्या अपघातात दोन जवानांचा मृत्यू; ०९ जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

 • पुण्याच्या सैन्य महाविद्यालयात ही घटना घडली आहे.
 • जवानांची ब्रिज कंस्ट्रक्शन एक्सरसाइज सुरु होती तिथे हा ब्रिज कोसळला. 

पुणे : पुण्यातील मिलीटरी इंजिनिअरिंगमध्ये झालेल्या अपघातात दोन जवानांचा मृत्यू तर ०९ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जवान बॅली सस्पेन्शन ब्रिज लाँच करण्याचे प्रशिक्षण केले जात असताना एका बाजुच्या ब्रिजचा टॉवर पडला. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME) भारतीय लष्कराचे इंजिनिअर्सचे एक प्रमुख तांत्रिक आणि सामरिक प्रशिक्षण संस्था आहे. यात कॉम्बॅट इंजिनिअर, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्विस, बॉर्डर रेड्स इंजिनिअरिंग सर्विस (BRES) आणि सर्वे या सर्वांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भिवा खंडू वाघमोडे (वय २८ - पोस्ट नायक) मूळचा दौंडचा राहणारा आणि संजीवन पीके (वय २९ वर्ष, पोस्ट हवालदार) मूळ राहणार केरळ अशी मृत्युमुखींची नावे आहेत. यात एकूण ०९ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी डीसी शर्मा आणि सोनू कुमार या दोन शिपायांची प्रकृती चिंताजनक आहे. खडकी हॉस्पिटलमध्ये दोघांवर तर कमांड हॉस्पिटलमध्ये तिघांवर सध्या उपचार सुरू आहेत.

FlashBack 2019 : 'या' दहा नावांनी ढवळून काढलं महाराष्ट्राचं राजकारण

अन्य जखमींची नावे :

 1. मेजर सुर्यजित सिंग (खडकी)
 2. सुभेदार पी शंमुग्म (खडकी)
 3. नायक गोरे बीपी (कमांड)
 4. नायक शरद खोले (कमांड)
 5. नायक डीसी शर्मा (खडकी)
 6. नायक देवेंद्र सिंग बिष्ट (कमांड)
 7. हवालदार परमजीत सिंग (खडकी)
 8. नायक गुरपीत सिंग (खडकी)
 9. नायक मंदीप सिंग (सीएमई)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Indian Army soldiers died and 09 injured at College of Military Engineering in Pune