ट्रकखाली चिरडल्याने पुण्यातील दोघांचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

पुणे : भरधाव ट्रकने जबर धडक दिल्यानंतर ट्रकच्या पुढील चाकाखाली चिरडल्याने दोघांचा मृत्यु झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री नऱ्हे येथील पुलाजवळ घडली.
 
संतोष छगन मेहेर ( वय २२, रा रोपडे (क), ता माढा, सोलापुर) व स्वप्नील सुनिल देशमुख ( वय २२, रा. चाकण, खेड ) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी ट्रकचालक उमेश नाना जावळ ( वय ४१, रा मु पो मेढा ता जावळी जि सातारा) यास ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष व स्वप्नील हे दोघे त्यांच्या दुचाकीवरुन सोमवारी रात्री साडे बारा वाजता जात होते. नऱ्हे येथील भुमकर पुलाजवळील सेवा रस्त्यावर आले असताना पाठीमागुन भरधाव आलेल्या ट्रकने (एमएच 11 एएल 438) दुचाकीला पाठीमागुन धडक दिली. जोरदार धडक बसल्याने दुचाकी ट्रकच्या पुढ़ील चाकाखाली आली. त्यामध्ये संतोष व स्वप्निल दोघेही चिरडले गेले. या घटनेनंतर सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. त्यानंतर चालक जावळ यास अटक केली.

Web Title: two killed in truk accident in pune