Loksabha 2019: 2014च्या तुलनेत राज्यात बारामतीमध्ये सर्वाधिक मतांची वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मे 2019

महाराष्ट्रातील सर्वच 48 मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदान वाढले असून सर्वाधिक दोन लाख 32 हजार 829 मतांची वाढ बारामतीमध्ये झाली आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केवळ ८४० मतांची वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून दिसून येते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 2014च्या तुलनेत जवळपास तेवढेच मतदान झाल्याचे टक्केवारी सांगत आहे. वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला याचीच सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे.

पुणे: महाराष्ट्रातील सर्वच 48 मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदान वाढले असून सर्वाधिक दोन लाख 32 हजार 829 मतांची वाढ बारामतीमध्ये झाली आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केवळ 840 मतांची वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून दिसून येते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 2014च्या तुलनेत जवळपास तेवढेच मतदान झाल्याचे टक्केवारी सांगत आहे. वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला याचीच सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे.

बारामतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे पवार निवडणूक लढवत आहेत. तर, भाजपकडून दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहूल कुल यांच्या पत्नी कांचन कुल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बारामती मतदारसंघात राज्यातील सर्वाधिक दोन लाख 32 हजार 829 मतांची वाढ नोंदवली गेली आहे. बारामती मतदारसंघातील हे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार? नवमतदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मतदार असल्याचा भाजपचा दावा खरा ठरणार की पवारांची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी बारामतीकर हिरिरीने बाहेर पडल्याचे स्पष्ट होणार याबाबत आता उत्सुकता आहे.

दरम्यान, शहरी भाग असलेल्या आणि भाजपचे वर्चस्व असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 62 टक्के मतदान झाले असून याचा सुळेंना फायदा होणार की तोटा होणार याचीही चर्चा सध्या मतदारसंघात चालू आहे. एकूणच या चर्चांना आता 23 मे निकालाच्या दिवशी पूर्णविराम मिळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Lakh 32 Thousand Votes Increase In Baramati lok sabha constituency