बिबटयाच्या दुरावलेल्या बछड्यांची अखेर आईशी भेट

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

आई व पिल्लांच्या भेटीचा हा प्रसंग येथे लावलेल्या स्वयंचलित कॅमेऱ्यामुळे प्रथमच छायाचित्रीत करण्यात यश...

 भेटीच्या प्रसंगाचे पथमच छायाचित्रण करण्यात यश

जुन्नर : तालुक्यातील कुसूर येथील शेतकरी सतीश परदेशी यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना बुधवारी बिबटयाचे केवळ एक महिना वयाचे नर व मादी असे दोन बछडे सापडले होते. आईपासून दुरावलेल्या बछडयांना दिवसभर सांभाळून सायंकाळी आईच्या ताब्यात देण्यासाठी त्यांना शेतात सोडण्यात आले. 

आई व पिल्लांच्या भेटीचा हा प्रसंग येथे लावलेल्या स्वयंचलित कॅमेऱ्यामुळे प्रथमच छायाचित्रीत करण्यात माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राचे डॉ.अजय देशमुख व महेंद्र ढोरे यांना वन कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यश मिळाले आहे. यावेळी वनरक्षक संजय गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य झाले. या प्रसंगाचे छायाचित्रे तसेच चित्रण करण्यात आले आहे. 
 

Web Title: Two Leopard Cubs Rescued & Reunited with Mother in Junnar

फोटो गॅलरी
व्हिडीओ गॅलरी