बनावट नोटा देण्यास आलेल्या दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

- महागडया कारमधून बनावट भारतीय चलनी नोटा (एफआयसीएन) देण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. 
- 64 हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटा व कार जप्त करण्यात आली

पुणे : महागडया कारमधून बनावट भारतीय चलनी नोटा (एफआयसीएन) देण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 64 हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटा व कार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

शुभम दिलीप शिरसागर (वय 24) व  राहुल दिनकर वचकल (वय 20, दोघेही रा. लोणंद, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. बनावट चलनी नोट देण्यासाठी दोघेजण पुण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती अमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार, पथकाने सापळा रचून  दोन्ही आरोपींना अटक केली.

त्यांच्याकडुन 2000 रु. दराच्या 3 नोटा, 500 रु. दराच्या 80 नोटा, 200 रु. दराच्या 92 नोटा व 100 रुपये दराची एक नोट अशा एकूण  64,500 रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two men arrested for giving fake currency notes in Pune