पुणे : बॅंक ऑफ बडोदाचे एटीएम मशीन चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडी येथे बॅंक ऑफ बडोदाचे एटीएम आहे. रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांकडून एटीएम मशीन चोरी करण्याचा प्रयत्न केला जात होता

पुणे : पहाटेच्या सुमारास एटीएम मशीनमध्ये छेडछाड करुन मशीन चोरुन नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. याप्रकरणी येवलेवाडी येथे कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

श्रीराम विकास हनवते (वय 26, रा. रामदासनगर, चिखली, पिंपरी), रामेश्‍वर बळीराम देशमुख (वय 24, रा. देशमुख टाकळी, परळी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राकेश सहाय (वय 52, पिसोळी) यांनी फिर्याद दिली आहे.

- पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडी येथे बॅंक ऑफ बडोदाचे एटीएम आहे. रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांकडून एटीएम मशीन चोरी करण्याचा प्रयत्न केला जात होता. हा प्रकार फिर्यादी यांनी पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन आरोपींना अटक केली.

पिंपरी : ...म्हणून सॉफ्टवेअर इंजिनीअरने केली 5 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two men arrested for stealing ATM machine in pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: