

NDPS Act Case Filed Against Two Men After Police Action Over Cannabis Smoking Near Palkhi Ground Area
esakal
लोणी काळभोर: हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पालखी मैदान परिसरात ओढ्यालगत लिंबाच्या झाडाखाली चिलीममध्ये गांजा भरून ओढणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी पथकाच्या मदतीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास करण्यात आली.