
पीडित मुलीच्या आईचे निधन झाल्यामुळे ती वडिलांबरोबर राहत होती. माझ्या नातीकडे लक्ष द्या, असे फिर्यादी यांनी नातीच्या शेजारी राहत असलेल्या महिलेला सांगितले होते.
पुणे : मद्यपान करण्यासाठी एकत्र येत मित्राच्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दोघा गुन्हेगारांनी मैत्रीच्या नात्याला काळिमा फासत मित्राच्या मुलीवर एक महिना अत्याचार केले होते.
- Farmers Protest: आंदोलनाचा चेहरा बनलेल्या सुखदेव यांनी सांगितलं 'त्या' फोटोमागील सत्य!
दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्यात यावी. तसेच मनोधैर्य योजनेअंतर्गत संबंधित मुलीला नुकसानभरपाई मिळवू शकते, असे निकालात नमूद करण्यात आले आहे. विशेष न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी हा निकाल दिला. गणेश ऊर्फ सिद्धू विलास भालेराव (वय 27) आणि सुधीर छत्रभूज गायकवाड (वय 27, रा. मुळानगर, जुनी सांगवी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. नोव्हेंबर 2015 मध्ये हा प्रकार घडला होता. पीडित 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आजीने या प्रकरणी तक्रार दिली होती. सरकारी वकील सुनील मोरे यांनी खटल्याचे कामकाज पाहिले.
- Video: 'जर लव्ह जिहाद कराल, तर...'; मुख्यमंत्र्यांनी दिला धमकीवजा इशारा
पीडित मुलीच्या आईचे निधन झाल्यामुळे ती वडिलांबरोबर राहत होती. माझ्या नातीकडे लक्ष द्या, असे फिर्यादी यांनी नातीच्या शेजारी राहत असलेल्या महिलेला सांगितले होते. घटनेनंतर या महिलेने फिर्यादीला फोन करून जुनी सांगवी येथे येण्यास सांगितले. तेव्हा त्यांना हा प्रकार समजला. वडिलांसोबत दारू पिण्यासाठी येत असलेल्या दोघांना महिनाभर आपल्यावर अत्याचार केल्याचे मुलीने फिर्यादी यांना सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)