Farmers Protest: आंदोलनाचा चेहरा बनलेल्या सुखदेव यांनी सांगितलं 'त्या' फोटोमागील सत्य!

Farmers_Protest
Farmers_Protest

Farmers Protest 2020: नवी दिल्ली : दिल्ली आणि हरियाणा दरम्यान असलेल्या सिंघू सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची धग आता देशभरातील सर्व राज्यांमध्ये पोचली असून सगळीकडे या आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत.

शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी गेल्या आठवड्यात शुक्रवारी लाठीचार्ज केला होता. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. या घटनेदरम्यानचा एक फोटो सोशल मीडियात खूप व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका वृद्ध शेतकऱ्याला एक पोलिस कर्मचारी काठीने मारहाण करताना दिसत आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर बरीच खळबळ उडाली होती.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हा फोटो ट्विट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्याला भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी प्रत्युत्तर देताना ट्विट करत म्हटले की, या फोटोत जे दिसते ते अर्धे सत्य आहे. पण ट्विटरने मालवीयांच्या ट्विटला 'मॅनिपुलेटेड मीडिया' चे लेबल लावले होते.

या फोटोमध्ये दिसणाऱ्या ६० वर्षीय शेतकरी सुखदेव सिंह यांची एका हिंदी वृत्तसंस्थेने भेट घेतली आणि त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. शुक्रवारी सुखदेव सिंघू सीमेवर होते, त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधूर आणि लाठीचा मारा केला. फोटोमध्ये दिसणाऱ्या जवानाने सुखदेव सिंह यांना काठीने चांगलीच मारहाण केली होती. त्यामुळे सुखदेव यांचे हात काळे-निळे झाले होते. तसेच त्यांच्या पाय आणि पाठीवरही मारहाण केल्याचे निशाण दिसत आहेत.

सुखदेव म्हणतात की, 'तो तरुण फौजी मारहाण का करत होता, हे समजत नव्हते. कारण आम्ही काही घोषणा देत नव्हतो किंवा दगडफेक करत नव्हतो.'  ६० वर्षीय सुखदेव सिंह हे पंजाबमधील कपूरथला येथील रहिवासी असून ते अजूनही सिंघू बॉर्डरवर तैनात आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, तीन कायदे रद्द होईपर्यंत ते या आंदोलनात सहभागी राहणार आहेत.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com