Water Supply : पुण्यातील या भागसाठी देणार दोन एमएलडी जास्तीचे पाणी

कोथरूड, बावधनमधील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकाच्या अनेक तक्रारी होत्या.
water supply
water supplyesakal

पुणे - कोथरूड, बावधनमधील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकाच्या अनेक तक्रारी होत्या. आयुक्त विक्रम कुमार यांनी आज कोथरूड येथे चांदणी चौक येथे बैठक घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाय योजना करावे आणि दोन एमएलडी पाणी वाढवून देण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

भुसारी कॉलनी, बावधन भागातील ३३ सोसायट्यांना पाणी पुरवठा अपुरा होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यातच चांदणी चौकातील राष्‍ट्रीय महामार्गाच्या कामामुळे एक जलवाहिनी खराब झाली होती, ती महापालिकेतर्फे दुरुस्त न केल्याने एकाच जलवाहिनीवर संपूर्ण भाग अवलंबून होता. आयुक्तांनी आज या भागातील नागरिकांची बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी या भागातील माजी नगरसेवकांनीही त्यांचे मुद्दे उपस्थित केले.

त्यावेळी आयुक्तांनी खराब झालेली जलवाहिनी लगेच दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरु करून घ्या, तसेच या भागात पाण्याची मागणी वाढल्याने रोज दोन एमएलडी पाणी पुरवठा जास्त करावा अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यामुळे या भागात रोज २० लाख लिटर जास्त पाणी मिळणार आहे.

आयुक्तांनी वारजे येथील रखडलेले सेवा रस्त्याच्या कामाची पाहणी केली. येथील जागा मालकांनी जागा दिल्यास त्यांना नुकसानभरपाई म्हणून टीडीआर लगेच दिला जाईल असे आश्‍वासन दिले आहे. याच प्रमाणे नवले पूल, सिंहगड रस्त्यावरील रखडलेले नाट्यगृहाचे काम याची पाहणी आयुक्तांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com