कॉसमॉसप्रकरणी आणखी दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

पुणे - कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ला प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. सायबर हल्ला घडला, त्या वेळी या दोघांनी दहा बनावट एटीएम कार्डचा वापर करून, अजमेर येथील वेगवेगळ्या एटीएममधून साडेसात लाख रुपयांची रक्कम काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे  या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता नऊवर पोचली आहे.

रफिक अन्सारी आणि अब्दुल्ला शेख अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. कॉसमॉसवरील सायबर हल्ल्यासाठी ४१३ बनावट डेबिट कार्डचा वापर करून, अडीच कोटी रुपयांची रोकड देशाच्या विविध भागामधील एटीएम केंद्रांमधून काढली होती. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या तपासासाठी सायबर पोलिसांचे विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. 

संबंधित पथकाने मुंबई, इंदूर, कोल्हापूर, अजमेर या ठिकाणच्या एटीएम केंद्रांमधील सीसीटीव्ही चित्रीकरण मिळविले होते. त्याआधारे सात जणांना गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर आता अन्सारी व शेख यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणामध्ये आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Two more arrested Cosmos bank case