धक्कादायक! 24 तासात पुण्यात आणखी दोघांचा मृत्यू; मृतांचा आकडा ४ वर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

६० वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास झाल्याने  ससून रुग्णालयात दाखल केले होते, तपासणी दरम्यान कोरोनाची चाचणी केली असता महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे. तर, ५२ वर्षीय व्यक्तीला मधूमहेचा त्रास असून, उपचारा दरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाला.  मृत्यूनंतर व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून कोरोनाचा संपर्कबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

पुणे : पुण्यात  २४ तासांत आणखी दोघांचा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून पुण्यात मृतांचा आकडा ४ वर पोहचला आहे.  येरवडा भागातील लक्ष्मीनगर येथील 60 वर्षीय महिलेचा आणि भवानी पेठेतील कासेवाडी भागातील  ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
६० वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास झाल्याने  ससून रुग्णालयात दाखल केले होते, तपासणी दरम्यान कोरोनाची चाचणी केली असता महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे. तर, ५२ वर्षीय व्यक्तीला मधूमहेचा त्रास असून, उपचारा दरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाला.  मृत्यूनंतर व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून कोरोनाचा संपर्कबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

Coronavirus : कोरोनाचे थैमान सुरुच; रुग्णांची संख्या १२ लाखांवर

यापुर्वी ३० मार्चला एका पुरुषाचा आणि २ एप्रिलला एका महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान राज्यात कोरोनाबाधितंचा आकाडा  ६६७ वर पोहचली असून मृतांचा आकाड ३४ वर पोहचला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two more die in 24 hours and total death count of Corona is 4 in pune